बेळगाव

निपाणी : देवदर्शन करून परतत असताना बोरवडेजवळ अपघातात कोडणीचे पती-पत्नी ठार

backup backup

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी-सरवडे रोडवर बोरवडे पुलाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोडणी (ता. निपाणी) येथील पती-पत्नी जागीच ठार झाले.

भैरवनाथ आप्पासाहेब पाटील उर्फ कोराने (वय 45) व पुनम भैरवनाथ पाटील उर्फ कोराने( वय 40) अशी ठार झालेल्या पती-पत्नी दोघांची नावे आहेत. देवदर्शन घेऊन गावाकडे परतत असताना पती-पत्नीवर काळाने घाला घातल्याने कोडणी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोडणी येथील भैरवनाथ पाटील हे गायकवाडी हद्दीत असलेल्या शेतवाडीत आपल्या कुटुंबियासह राहत होते. ते आपली पत्नी पूनम यांना घेऊन शुक्रवारी सकाळी बारा वाजता गावातून देवदर्शनाला दुचाकीवरून गेले होते.

देवदर्शन करून परत येत असताना बोरवडे (ता. कागल) गावाजवळ असलेल्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव मालवाहतूक ट्रकची दुचाकीला समोरून धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील भैरवनाथ व पुनम हे जोराने बाजूला फेकल्याने ते दाेघे  डोक्यावर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची भीषणता इतकी होती की, घटनास्थळाचे चित्र हृदय पिळवटून टाकणारे होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोडणी येथील मयत पाटील कुटुंबियासह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची नोंद मुरगूड (ता. कागल) पोलिस ठाण्यात झाली. रात्री उशिरा मुरगूड येथील सरकारी रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर मूळगावी गायकवाडी शेतहद्दीत दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत पाटील यांच्या पश्चात आई, भाऊ, एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT