बेळगाव

Belgaum news: कोण डीसी? मी काम सुरुच ठेवणार!

कंत्राटदाराची गुर्मी : मोर्चानंतरही तुरमुरी डेपोत बांधकाम सुरूच, बालकामगारांनाही जुंपले

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कचरा प्रकल्प तुरमुरीतून हलवण्याची मागणी करत तुरमुरी आणि पंचक्रोशीतीली दहा गावांतील रहिवाशांनी शुक्रवारी मोर्चा काढलेला असतानाही कचरा डेपो परिसरात शनिवारी बांधकाम सुरूच होते. महत्त्वाचे म्हणजे मोर्चेकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पंधरा दिवसांत पर्यायी जागा शोधण्याची ग्वाही दिली होती. तरीही काम सुरूच ठेवून जिल्हाधिकारी म्हणजे किस झाड की पत्ती असेच जणू कंत्राटदाराला सुचवायचे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ग्रामस्थांना पंधरा दिवसांत कचरा डेपो समस्येवर तोडगा काढू, असे सांगितले होते. पण गेल्या काही काळापासून डेपोत सुरु असलेले बांधकाम शनिवारीही सुरुच होते. ते कंत्राटदाराने बंद केले नाही. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांच्या ग्वाहीही अर्थच उरला नाही, अशी आंदोलकांची भावना झाली आहे.

बाल कामगारही!

जिल्हा बाल कामगारमुक्त करण्यासाठी प्रशासन जागृती करत आहे. मात्र बेळगाव महानगर पालिकेनेच तुरमुरी कचरा डेपोच्या ठिकाणी बालकामगांराना जुंपले आहे, असा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांमुळे शनिवारी (दि.11) उघडकीस आला.

जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कृषी क्षेत्रातील बालमजुरीबद्दल चिंता व्यक्त केली होती. ज्या वयात मुलांनी शिकायचे असते, त्या वयात मुले काम करत आहेत, असे ते म्हणाले होते. मात्र अशीच घटना चक्क त्यांच्याच छायेखाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी तुरमुरी कचरा डेपो प्रकल्प बांधकाम स्थळी बालकामगारांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT