बी. वाय. विजयेंद्र मार्गदर्शन करताना व्यासपीठावर आमदार भालचंद्र जारकीहोळी, माजी आ. महांतेश कवठगीमठ, पी. राजीव, आमदार शशीकला जोल्ले, विरोधी पक्षनेते आर. अशोक, गीता सुतार आदी. Pudhari Photo
बेळगाव

काँग्रेसचे सरकार कुचकामी : भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र

बेळगावात भाजपचा जनआक्रोश मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, मुस्लिमांना विशेष आरक्षण व मागासवर्गीय निधीचा दुरुपयोग? ? याविरोधात भाजपने बुधवारी बेळगावात जनआक्रोश यात्रा काढली. राज्यातील काँग्रेस सरकार कुचकामी ठरले आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला. जनआक्रोश मोर्चा त्यांच्याच नेतृत्वाखाली काढण्यात आला.

पहिल्या टप्प्यातील मोर्चाला दक्षिण कर्नाटकात प्रतिसाद मिळाल्यानंतर भाजपने दुसर्‍या टप्प्यात जनआक्रोश मोर्चा बेळगावातून काढला. पक्षाचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोवा वेस चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. शहापूरमधील नाथ पै चौकमार्गे मोर्चा शिवाजी उद्यानात पोहोचला. जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रखर उन्हातही उत्साहाने यात्रेत सहभाग नोंदवला.

काँग्रेस सरकारने 50 हून अधिक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून गरीब व मध्यमवर्गीय जनतेवर अन्याय केला आहे, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

मोर्चात भाजपचे राज्याध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, खासदार जगदीश शेट्टर, आमदार विठ्ठल हलगेकर, आमदार अभय पाटील, आमदार भालचंद्र जारकीहोळी, आमदार शशीकला जाल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, गोविंद कारजोळ, आमदार निखिल कत्ती, दुर्योधन ऐहोळे, बी. श्रीरामलू, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, पी. राजीव यांसह नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT