बंगळूर : बंगळूरमधील जयनगर मतदारसंघात विकासकामे राबविण्यासाठी निधी देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे.
वकील एच. योगेंंद्र यांनी बुधवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे शिवकुमार यांच्याविरोधात तक्रार केली. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी यापूर्वी जाहीरपणे सांगितले होते की, जयनगर मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघांना विकासकामांसाठी निधी देण्यात यावा. जयनगर मतदारसंघाला निधीपासून वंचित ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे एच. योगेंंद्र यांनी तक्रार केली आहे.