शहर परिसरात पावसाची रिमझिम (Pudhari File Photo)
बेळगाव

City Drizzle Rain | शहर परिसरात पावसाची रिमझिम

वातावरणात कमालीचा गारठा; रुग्ण संख्येत वाढ

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहर परिसरात चार दिवसापासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता.? ? संततधार पाऊस नसला तरी सोमवारी (दि. 29) अधूनमधून पावसाची रिमझिम सुरु होती.

सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. रविवारी दिवसभर पावसाची उघडिप होती. सोमवारी मात्र? ? वातावरणात कमालीचा गारठा पसरला आहे. सकाळी दहा वाजता पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या.? ? दुपारच्या सत्रात ऊनही पडले होते. मात्र सायंकाळी चारनंतर पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली. पावसाचा बाजारपेठेवरही परिणाम जाणवला.? ? सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्‍या जेष्ठ नागरिकांची संख्या घटली होती. रात्री उशिरा बाजारपेठेत होणारी ग्राहकांची वर्दळ कमी झाली होती.

चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाचा परिणाम ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शहर उपनगरातील खासगी दवाखाने तसेच सरकारी दवाखान्यामध्येही सर्दी, खोकला आदी रुग्णांची संख्या वाढत आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने वातावरणात बदल झाल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT