बेळगाव ः नूतन पोलीस आयुक्तांनी गांजा व मटका कारवाईच्या सूचना दिल्याने पोलिस खातेही सतर्क बनले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये गांजा व मटका कारवाई जोमाने सुरू आहे. गेल्या चार दिवसांत सात प्रकरणी चौदाजणांवर गुन्हा दाखल करून 13,300 रुपये जप्त केले.
शिवबसवनगरमध्ये भाडोत्री घर घेऊन तेथे गांजा ठेवल्याच्या संशयावरुन सुमन विक्रांत दिडे (वय 23) या महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून 330 ग्रॅम गांजा जप्त केला. याची किंमत आठ हजार रुपये होते. एपीएमसी पोलिसांनी एपीमसीत छापा टाकून विनायक निंगाप्पा नाईक (वय 46, रा. ज्योतीनगर, कंग्राळी केएच) याला मटकाप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून 260 रुपये व साहित्य जप्त केले.
बॉक्साईट रोड हिंडलगा येथे छापा टाकून मटका प्रकरणी दोघांना अटक केली. माळमारुती परिसरातील बंटर भवनात इम्तियाज अब्दुलखादर मिर्झा (वय 50) व जावेद शेख (दोघेही रा. गांधीनगर) हे दोघेजण मटका घेत असल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून 1,500 रुपये जप्त केले. 10 जून रोजी केआयडीबी हॉल रस्त्यावर लक्ष्मण यल्लाप्पा नाईक व परशुराम (दोघेही रा. कणबर्गी) हे दोघेजण मटका घेत असल्याने त्यांच्यावर माळमारुती पोलिसांनी कारवाई करत 1,420 रूपये जप्त केले. याच दिवशी खंजर गल्लीत छापा टाकून मटका घेणार्याला अटक केली.
सदाशिवनगरजवळील स्मशान भूमीजवळ जुगार खेळणारे नवीन रविंद्र पाटील, गौतम जैन, प्रथेमश यादव, दयानंद धामणेकर, दीपक मुदकण्णावर हे सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून 4,150 रुपये जप्त केले.