शिवानंद नीलण्णावर Pudhari
बेळगाव

Shivam Associates fraud case: नीलण्णावरच्या जामीन अर्जावर बंगळूरमध्ये निर्णय

विशेष न्यायालयात सुनावणी; सीआयडीकडून आक्षेप नोंदविला जाण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बहुचर्चित शिवम असोसिएट्स गुंतवणूक गैरव्यवहार प्रकरणातील संशयित शिवानंद नीलण्णावरने बंगळूरमधील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जाला सीआयडीकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या अर्जावरील सुनावणीकडे हजारो गुंतवणूकदारांसह संबंधितांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत या प्रकरणाची सुनावणी बेळगावमधील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होती. मात्र, आर्थिक गैरव्यवहाराचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी बंगळूरमधील विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. तेथेच संशयिताच्या जामिनावर अर्जावर सुनावणी होणार आहे. संशयिताच्या अर्जात आपण निर्दोष असून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आपल्याविरुद्धचे आरोप निराधार असल्याने अंतिम निकाल लागेपर्यंत जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली आहे.

मात्र, या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. संशयिताला जामीन मंजूर झाल्यास पुराव्यांमध्ये हस्तक्षेप होण्याची व साक्षीदारांवर प्रभाव टाकला जाण्याची ण्याची शक्यता असल्याने सीआयडीकडून जामीन अर्जाला विरोध करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT