काशिनाथ सुळकुडे
चिकोडी : स्वातंत्र्य पूर्वकाळात 1914 मध्ये चिकोडीतील घोरपडे व भोसले घराण्याकडून स्थापन झालेला कुमार गजानन मंडळाने यंदा 111 व्या वर्षात पदार्पण केले आहे. चिकोडी शहरासह तालुक्यातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून कुमार गजानन मंडळाला मान मिळाला आहे. शहरात 43 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत.
स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरु केल्यानंतर चिकोडीत 1914 मध्ये घोरपडे व भोसले कुटुंबाने सार्वजनिक श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना केली. हे गणेश मंडळ चिकोडी शहरातील तसेच चिकोडी तालुक्यातील पहिले गणेश मंडळ आहे. चिकोडी शहरात 43 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. 2014 मध्ये मंडळांने शतक महोत्सव साजरा केला. मंडळाकडून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, कोरोना काळात गरजूंना मदत, अनेक सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदत करण्यात येते. 111 वर्षांपासून सर्व कार्यकर्ते एकोप्याने गणेशोत्सव साजरा करत आले आहेत. मंडळातर्फे पारंपारिक वाद्यांचा वापर केला जातो. मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष संजय भोसले, वासुदेव मिरजी, विनोद शेटके, प्रसाद शारबिद्रे, नागेश कोल्हे, बंडा भोसले, सुमित कुरडेकर, प्रथमेश भोपळे,, आकाश उदोशी, अमित भोसले, सोमू गरडीगुद्दी, अमित समतशेट्टी, सिद्धेश्वर पुंडीकटगी, आदित्य मुसंडी, मयूर भोसले, सुरेश शारबिद्रे हे कार्यकर्ते परंपरा पुढे नेत आहेत.