Karnataka Accident : चिकोडीजवळ अपघातात एक ठार 
बेळगाव

Karnataka Accident : चिकोडीजवळ अपघातात एक ठार

चिकोडीजवळील नणदीवाडीजवळ ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन एकजण ठार

पुढारी वृत्तसेवा

चिकोडी : चिकोडीजवळील नणदीवाडीजवळ ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन एकजण ठार झाला. गणेश शंकर मोपगार (वय ६३, रा. एकसंबा) असे मृताचे नाव आहे.

केएसआरटीसीचे निवृत्त बस वाहक आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश मोपगार हे वैयक्तिक कामानिमित्त दुचाकने चिकोडीला जात असताना नणदीवाडी येथील टाईल्स दुकानाजवळ हा अपघात घडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT