sexual harassment Pudhari
बेळगाव

Karnataka crime: दहावीच्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ

संतप्त पालकांकडून शिक्षकाला मारहाण

पुढारी वृत्तसेवा

चिकोडी : दहावीच्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाला संतप्त पालकांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी चिकोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करोशी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, करोशी येथील एका माध्यमिक शाळेत कन्नड विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कन्नड विषयात उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना शाळेतील वर्गखोली तसेच स्वच्छतागृहात नेऊन लैंगिक छळ केल्याचा त्‍याच्‍यावर आरोप आहे.

पाचहून अधिक विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचा त्रास दिल्याची माहिती समोर आल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त पालकांनी शाळेत घुसून संबंधित शिक्षकाला जाब विचारला मारहाण केली. या घटनेमुळे शाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच चिकोडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सदर शिक्षक मागील १८ वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार असून पोलिस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी चिकोडीचे पीएसआय बसगौडा नेरली त्यांनी भेट देऊन जमावाला बाजूला करत शिक्षकाला ताब्यात घेतले. त्यानंतर चिकोडीचे डीडीपीआय सीताराम व बीईओ प्रभावती पाटील, सीपीआय विश्वनाथ चौगला यांनी भेट देऊन पालक व एसडीएमसी सदस्यांबरोबर चर्चा केली.

तसेच सदर शिक्षकाला निलंबित करण्यात येईल असे सांगितले. डीडीपीआय सीताराम यांनी अशा प्रकारच्या घटना दुर्दैवी असून याप्रकरणी बीईओ यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करून अहवाल सादर केला जाईल, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT