Chapgaon Temple theft: चापगाव मंदिरात साडेदहा लाखांची चोरी  Pudhari
बेळगाव

Chapgaon Temple theft: चापगाव मंदिरात साडेदहा लाखांची चोरी

चांदीचे मुखवटे लांबविले : मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : चापगावमधील (ता. खानापूर) ग्रामदेवता फोंडेश्वर मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीवरील दोन चांदीचे मुखवटे चोरट्यांनी लांबविले आहेत. रविवारी (दि. 1) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांची किंमत साडेदहा लाख रुपये इतकी आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फोंडेश्वरचा वार्षिक यात्रोत्सव आणि महाशिवरात्रीच्या काळात दोन्ही देवांच्या मूर्तींवर चांदीचे मुकुट चढविले जातात. मंदिरासमोरचा दरवाजा व गाभाऱ्याच्या दरवाजाला कुलूप लावण्यात येते. चोरांनी समोरच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. खिडकीतून गाभाऱ्यात उडी घेऊन फोंडेश्वरच्या दोन्ही मूर्तींवरील सुमारे सव्वा तीन किलो वजनाचे चांदीचे मुकुट लांबविले. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी चार दिवसांपूर्वीच त्यात बिघाड झाल्याने कॅमेरे बंद असल्याचे दिसून आले. चोरी झाल्याची बातमी पसरताच चापगावसह परिसरातील शेकडो भाविकांनी मंदिरासमोर गर्दी केली.

नंदगडचे पोलीस निरीक्षक रवीकुमार धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगावमधून ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण केले. वड्डेबल रस्त्यावरील कमानीपर्यंत जाऊन श्वान परत आले. त्यामुळे, कमानी जवळ दुचाकी लावून चोरटे चालत मंदिरापर्यंत आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून शोध सुरु केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT