बेळगाव ः सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला संशयित. बाजूला दोघी वृद्धा.  Pudhari Photo
बेळगाव

घरात घुसून चेनस्नॅचिंग

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा

केबल दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसलेल्या तरुणाने वृद्धेची दीड तोळ्याची सोनसाखळी लांबविली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ढोर गल्ली, वडगाव येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी वृद्धेच्या जावयाने शहापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, ढोर गल्ली वडगाव येथे हिराबाई विष्णू श्रेयकर (वय 84) व त्यांची सवत मंजुळा विष्णू श्रेयकर या दोघी राहतात. हिराबाई यांचा मुलगा अमेरिकेला आहे, तर मंजुळा यांचा मुलगा बंगळूर येथे नोकरीनिमित्त आहे. घरी दोघी वृद्धा असल्याचे पाहून बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोघे तरुण घरासमोर आले.

यापैकी लाल व पांढर्‍या पट्ट्याचा पूर्ण बाह्यांचा शर्ट व पांढरा बर्म्युडा घातलेला तरुण केबल दुरुस्ती करायची आहे, असे सांगत घरात घुसला. यावेळी दोघीही वृद्धांनी आपले जावई बाहेर गेले आहेत ते आल्यानंतर या, असे सांगितले तरी तो काहीही ऐकत नव्हता. यापैकी मंजुळा यांना तो जिन्यावरून वरती केबल दाखवा, असे सांगत घेऊन गेला. वर गेल्यानंतर त्याने गळ्यातील दीड तोळ्याच्या सोनसाखळीला हिसडा मारून ती घेऊन पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी वृद्धेचे जावई कुमार नामदेव कदम यांनी शहापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक एस. एस. सीमानी तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT