बेळगाव

कर्नाटकात दुष्काळ, पूरव्यवस्थापनासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात दुष्काळ आणि पूर व्यवस्थापनासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात यावी, असा आदेश राज्य सरकारने दिला होता. त्याप्रमाणे महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीत पाटबंधारे खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे, कृषिमंत्री चलुवरायस्वामी, खाण व फलोत्पादन मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन आणि सहकार मंत्री के. एस. राजन्ना हे या उपसमितीचे सदस्य आहेत.
राज्यात गेल्या वर्षभरात अचानक वळवाचा पाऊस झाल्याने हजारो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हजारो घरांची पडझड झाली आहे. एनडीआरएफ पथकाला पूर निवारण्यासाठी लागणार्‍या साहित्याची खरेदी करावी, असा आदेशही देण्यात आला आहे. पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध ठिकाणच्या पथकांशी संपर्क साधून तयारीत राहण्याचे आदेेश देण्यात आले आहेत. 2018 नंतर सलग तीन वर्षे राज्यातील विविध जिल्ह्यांत जनतेला पुराचा सामना करावा लागला. अशा जिल्ह्यांना पूराआधीच महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

SCROLL FOR NEXT