बेळगाव

Bus employees strike: पगारवाढ अमान्य; बस कर्मचारी संपावर जाणारच

२० मेपासून बेमुदत आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राज्य सरकारने देऊ केलेली साडेबारा टक्के पगारवाढ अमान्य करत राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने २० मे पासून संपावर जाण्याच निर्णय घेतला आहे. किमान २५ टक्के पगारवाढ हवी, अशी त्यांची मागणी आहे.

राज्यातील परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची सरकारने पूर्तता केली नाही. त्यामु‍ळे राज्य रस्ते वाहतूक कर्मचारी महासंघाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन कर्मचाऱ्यांनी २५ टक्के पगार वाढीची मागणी केली होती.

मात्र सरकारने १२.५० टक्के पगारवाढीचा आणि ३८ महिन्यांऐवजी २६ महिन्यांची थकबाकी देण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश कर्मचारी संघटनेने फेटाळला असून, राज्यातील चार परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी २० मेरोजी सकाळी ६ पासून कामावर हजर न होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील बस सेवा स्थगित होण्याची शक्यता आहे. याआधी गेल्‍या मार्चमध्‍ये परिवहन कर्मचार्‍यानी संपावर जाण्‍याचा इशारा दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT