Breast Cancer
घ्या खबरदारी, राहा स्तन कर्करोगापासून दूर instagram
बेळगाव

Breast Cancer | घ्या खबरदारी, राहा स्तन कर्करोगापासून दूर

भारतात रुग्णांची संख्या अधिक वेळीच निदान अन् उपचार आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

अमृत वेताळ

बेळगाव : असमतोल आहार, बदललेली जीवनखौली, वयात येण्याआधीच पेणारी मासिक पाळी, स्तनपान न करणे, आनुवंशिकता, ५० ते ५५ वर्षापर्यंत येणारी मासिक पाळी, लनूपणा आदी कारणांमुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (कॅन्सर) होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस बालत चालले आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्तनाचा कॅन्सर होणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये विल्हा आरोगा आणि कुटुंब खात्याच्या वतीने जिल्हातील लाख २५ हजार ३४ महिलांची चाचणी (स्क्रिनिंग) करण्यात आली. त्यापैकी १८९ महिलांना स्तनांचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या वतीने माहिती घेतली जाते. संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्यांचे स्क्रिनिंग केले जाते. कॅन्सरचा पुरुष आढळल्यास त्यांचे प्राथमिक आरोग केंद्र, सीएचसी, कलुवा आरोग्य हस्पिटल, जिल्ला स्म्पालयामध्ये नमुने घेऊन गालगासाठी पाठविले जातात. त्यानंतर स्तनाचा कर्करोग जागृती दिवस करण्यार भर देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ३ ते ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावांसाठी एक केंद्र आयुष्यमान आरोग्य मंदिर (सबसेंटर) सुरु करण्यात आली आहेत. त्यावर समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ), प्राथमिक आरोग्य सुरक्षा अधिकारी कार्यरत असतात. आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन लोकांच्या आरोग्यबद्दलची माहिती घेतली जाते. संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्यांचे त्यांचे प्राथमिक आरोग केंद्र, सीएचसी, तालुका आरोग्य हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालयामध्ये नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पाठविले जातात.त्यानंतर त्यावर औषधोपचार केले जातात.

स्तनाचा कॅन्सर होण्याची कारणे -

  • लवकर येणारी मासिके पाळी

  • ५० ते ५५ वर्षांपर्यंत येणारी मासिक पाळी

  • लठ्ठपणा

  • उशिरा मातृत्व येणे

  • स्तनातून दुधाव्यतिरिक्त अन्य स्त्राव होणे

  • अनुवंशिकता

  • • स्तनपान करण्याचा कालावधी कमी करणे

  • किंवा स्तनपान न करणे

  • शरीराचे वजन वाढणे

  • धुम्रपान, मद्यप्राशन करणे

  • हार्मोन्सचा वापर करणे

कॅन्सर कसा ओळखाल?

  • बाधित स्तनाला वेदना होत नाही

  • चर्माच्या रंगात बदल होगे

  • दुधाव्यतिरिक्त दुसरा स्त्राव होणे

  • स्तनाच्या चर्मावर खड्डा पडणे

  • स्तनाग्रे आत ओढली जाणे

  • स्तनाला सूज येणे

काय खबरदारी घ्यावी?

  • वीस वर्षांवरील तरुणी आणि महिलांना महिन्यातून एका निश्चित तारखेला स्तन तपासणी करावी

  • स्वतः स्तन परीक्षण करणे

  • मॅमोग्राफी करणे

  • डॉक्टरांकडून स्तन तपासणी करणे

  • अल्ट्रासोनोग्राफी करणे

  • खबरदारी घेणे गरजेचे

कॅन्सर होऊ नये म्हणून खबरदारी घेणे जरुरीचे आहे. बाधित रूग्णांवर शस्त्रक्रिया, रेडीओथेरपी किंवा औषधोपचार केले जातात. यातून रुग्ण बरा होत नसला तरी त्याचे आयुष्य वाढू शकते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.