Bengaluru Migrant Quarry Labourers Killed  AI Photo
बेळगाव

Karnataka Mine Landslide | बेंगळुरू दक्षिण जिल्ह्यात खाणीत दरड कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

नियम मोडणाऱ्या खाण मालकांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

Bengaluru Migrant Quarry Labourers Killed

काशिनाथ सुळकुडे

बेंगळुरू : ​ बेंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील तवरेकेरे जवळील मादपट्टण येथे एका दगड खाणीत (क्वारी) गुरूवारी (दि.२) मोठी दुर्घटना घडली. कावेरी क्रशरच्या मालकीच्या या खाणीत काम करत असताना अचानक एक मोठा खडक कोसळल्याने बिहारमधील सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि खाण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, या खाणीच्या वैधतेची आणि नियमांच्या अंमलबजावणीची चौकशी करण्यासाठी आज दुपारपर्यंत अहवाल मागवला आहे. नियम मोडणाऱ्या खाण मालकांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर खाणी सुरू आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली. राज्य सरकारने पीडित कुटुंबांना तात्काळ भरपाई द्यावी आणि खाणींमध्ये कठोर सुरक्षा नियम लागू करावेत, अशी मागणी त्यांनी केली. अशा दुर्घटना वारंवार घडूनही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT