Fraud Case file photo
बेळगाव

Bengaluru Fraud Case: लग्नाळू तरुणाची ३५ लाखांची फसवणूक

बंगळूरमधील घटना; मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे तरुणीकडून गंडा

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : लग्नासाठी मॅट्रिमोनियल वेबसाईटवर जोडीदार शोधणाऱ्याला तरुणाची एका तरुणीने तब्बल ३५ लाखांची फसवणूक केल्याची घटना बंगळूरमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित तरुणीवर आग्नेय विभागातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी नावाच्या तरुणीने अनिल नावाच्या व्यक्तीची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनिल एका मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे जोडीदार शोधत होता. त्यावेळी भास्कर राव नावाच्या एका व्यक्तीने अनिलला फोन करून एक स्थळ सुचविले. त्याने सुचविलेली प्रोफाईल अनिलला आवडली. त्यामुळे, भास्कर रावने त्याला लक्ष्मीचा नंबर दिला. त्यानंतर अनिलला लक्ष्मीच्या मोबाईल नंबरवरून फोन आला. दोघांमध्ये काही दिवस मोबाईलवर संभाषण झाले. तिच्यावर विश्वास ठेवून अनिलने ३५ लाख रुपये ऑनलाईन पाठविले. पण, पैसे पाठविल्यानंतर काही क्षणाताच वेबसाईटवरील त्याचे खाते डिलीट करण्यात आले.

दरम्यान, ज्या तरुणीचा नंबर देण्यात आला होता, तिचा मोबाईल फोनही बंद होता. अखेरीस आपली फसवणूक झाल्याची तक्रार अनिलने सायबर पोलिस ठाण्यात केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT