Jewellery Theft (Pudhari Photo)
बेळगाव

Bengaluru jeweller robbery: बंगळुरातील सराफाला तीन कोटींना लुटले

नगरटपेटमधील प्रसिद्ध 'मेहता ज्वेलरी' दुकानाचे मालक या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : घाऊक दरात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याचे तीन कोटी रुपयांचे १ किलो ८५० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मल्लेश्वरम येथील संपिगे रोडवर बुधवारी (दि. २०) घटना घडली आहे. नगरटपेटमधील प्रसिद्ध 'मेहता ज्वेलरी' दुकानाचे मालक या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आहेत.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, परेश सोनी नामक एका व्यक्तीने मेहता ज्वेलरीच्या मालकाला मोबाईलवर संपर्क साधून 'आपली माही एंटरप्रायझेस' नावाची कंपनी असून त्याला घाऊक दरात मोठ्या प्रमाणात दागिन्यांची गरज असल्याचे म्हटले होते. तसेच मल्लेश्वरममधील एका कार्यालयाच्या दारावर 'लोटस ज्वेलरी' व 'माही एंटरप्रायझेस' असे खोटे नामफलक लावले होते. या कार्यालयाचा त्याच्याशी किंवा त्याच्या व्यवसायाशी काहीही संबंध नव्हता.

मात्र, ऑर्डर मोठी आहे असे समजून मालकाच्या सूचनेनुसार व्यवस्थापकाने सुमारे तीन किलो सोन्याचे दागिने घेउन मल्लेश्वरम येथील संपिगे रोडवरील परेश सोनीच्या कार्यालयात भेट दिली. सोनी याने तपासण्याच्या नावाखाली शेजारच्या केबिनमध्ये बसलेल्या त्याचा साथीदार चंद्रशेखरकडे सोपवून यादी तयार करण्यास सांगितले. दागिन्यांचे फोटो काढण्याच्या बहाण्याने शेजारच्या खोलीत गेलेला संशयित सोने घेऊन पळून गेला. आत गेलेले लोक बराच वेळ परत न आल्याने व्यवस्थापकाला संशय आला. त्याने तपासणी केली असता, फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने श्याम, रामचंद्र व परेश सोनी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून मल्लेश्वरम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT