fraud 
बेळगाव

Bengaluru house lease fraud: घर लीजवर घेऊ इच्छिणाऱ्यांची फसवणूक

घरे लीजवर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना लक्ष्य करुन २०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : बंगळूरसारख्या शहरात घरे लीजवर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना लक्ष्य करुन २०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. जॉन्स अॅसेट नावाच्या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या मध्यस्थ कंपनीने ३०० हून अधिक लोकांची फसवणूक केली असून कंपनीचा मालक फरार झाला आहे.

बंगळूर शहरात अलीकडे लीजवर मिळणाऱ्या घरांचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा फायदा घेत ही कंपनी ग्राहकांना एक आकर्षक ऑफर देत होती. या माध्यामातून लोकांकडून घरांच्या लीजचे पैसे घेत होती. आम्ही घर शोधून देऊ व मासिक भाडेही भरु. त्यामुळे, तुमचे पैसे वाचतील व भाडे भरणेही टळेल असे सांगून प्रत्येकी १० ते ७५ लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. पहिल्या काही महिन्यांचे भाडे भरल्यानंतर त्या कंपनीने लूटमार सुरु केली. गायत्री नामक एका पीडितेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात या फसवणुकीची तक्रार केली आहे. आपली ३७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तिने केला आहे.

घरमालकाने तिला घर खाली करण्यास सांगितल्यानंतर गायत्री आपले पैसे परत मागण्यासाठी कंपनीकडे गेली. कंपनीने तिला पैसे परत दिले नाहीत. उलट ती रक्कम त्यांच्याकडे गुंतवून दरमहा ४% व्याज देण्याचा प्रस्ताव ठेवला. यावर विश्वास ठेवून त्याचे भांडवलात रुपांतर करणाऱ्या गायत्रीला केवळ दोन महिन्यांतच कंपनी बंद करण्यात आल्याचे समजले. कंपनीचा मालक स्टीफन आर्थर हा कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT