बेळगाव

Belgaum Accident : कार-टिप्‍परच्या धडकेत युवक ठार

मुडलगी-गुर्लापूर रस्त्यावर कार आणि टिपर यांच्यात समोरासमोर धडक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मुडलगी-गुर्लापूर रस्त्यावर बुधवारी पहाटे कार आणि टिपर यांच्यात झालेल्या अपघातात डायलिसिस विभागातील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मुरगेश मंटूर (वय ३२, रा. कोकटनूर, ता. अथणी) असे मृताचे नाव आहे.

मुरगेश हे मुडलगी येथील सरकारी आरोग्य केंद्राच्या डायलिसिस विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते कोकटनूर येथून कारने मुडलगीला कामावर जात असताना मुडलगी-गुर्लापूर रस्त्यावर कार आणि टिपर यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा चक्काचूर झाला.

या अपघातात मुरगेश यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे सामुदायिक आरोग्य केंद्रातील सहकाऱ्यांमध्येही शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT