Drowning Incident  Pudhari Photo
बेळगाव

Belgaum Drowning Incident : बदकाची अंडी शोधताना युवकाचा बुडून मृत्यू

अनगोळच्या नाथ पै तलावातील वेलींत अडकला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरात मांजाने विद्यार्थ्याचा बळी गेल्याची घटना ताजी असताना अनगोळातील नाथ पै तलावात बदकांची अंडी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला.

मृत युवकाचे नाव सतीश शशिकांत कदम (३०, रा. लोहार गल्ली, अनगोळ) असे आहे. तो तलावात बदकाची अंडी शोधण्यासाठी उतरला होता, अशी माहिती मिळाली. त्याला चांगले पोहता येत होते. मात्र तलावात मोठ्या प्रमाणात कमळाच्या वेली आहेत. त्या वेलीत पाय अडकल्याने त्याला पोहता आले नाही आणि त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सतीश सकाळीच तलावाकडे गेला होता. अंगावरील कपडे उतरवून तलावात उतरलेला सतीश बराचवेळ बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी शोध घेतला असता तलावाच्या काठावर त्याचे कपडे आणि चप्पल दिसून आले. त्यामुळे तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. उद्यमबाग पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर एचईआरएफ या एनजीओच्या कार्यकर्त्यांकडे मदत मागण्यात आली. एचआरईएफच्या कार्यकर्त्यांनी अर्ध्या तासाच्या शोधकार्यानंतर सतीशचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह चिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालच्या शवागारात पाठवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT