Belgaum drowning case : जक्कीनहोंडा तलावात बुडून युवकाचा मृत्यू Pudhari File Photo
बेळगाव

Belgaum drowning case : जक्कीनहोंडा तलावात बुडून युवकाचा मृत्यू

अचानक पाय घसरून पाण्यात पडला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना मराठा मंदिराजवळच्या जक्कीन होंडा तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. राहुल मारुती बेकवाडकर (वय 35, रा. वड्डरवाडी-हिंदवाडी) असे त्या दुर्देवी युवकाचे नाव आहे.

राहुल हा घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी जक्कीन होंडा तलावावर गेला होता. पूजा करत असताना अचानक पाय घसरून तो तलावात पडला. त्याला वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र तो पाण्यात बुडाला. काही जणांनी तलावात उडी मारून त्याला तलावातून बाहेर काढले. त्यावेळी तो बेशुद्ध होता. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरनी सांगितले. ही माहिती टिळकवाडी पोलिसांना देण्यात आली. टिळकवाडी पोलिसांनी पंचनामा करून जिल्हा रुग्णालयातील शवगृहात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT