Drowning Incident  Pudhari Photo
बेळगाव

Belgaum Drowning Incident : बसवण कुडचीत युवकाचा बुडून मृत्यू

तलावात जनावरे धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १७) दुपारी बसवण कुडचीतील देवराज अर्स कॉलनीत घडली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : तलावात जनावरे धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १७) दुपारी बसवण कुडचीतील देवराज अर्स कॉलनीत घडली. मल्लेश महांतेश उप्पार (वय १८, रा. देवराज अर्स कॉलनी, बसवण कुडची) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मल्लेश व त्याचा जुळा भाऊ व आणखी एकजण जनावरे घेऊन तलावाजवळ गेले होते. जनावरे धुतल्यानंतर पोहत असताना मल्लेशचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तलावात शोध घेऊन मल्लेशला बाहेर काढले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. मल्लेशने बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत ८५ टक्के गुण मिळवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT