Online Gaming Scam Pudhari
बेळगाव

Belgaum Online Gaming Scam: ऑनलाईन खेळ...नव्हे २४ लाखांचा 'गेम'

तरुणाची सायबर भामट्यांकडून फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. गुरुवारी एकाच दिवशी दोन प्रकरणांची शहर सीईएन पोलिसांत नोंद झाली. ऑनलाईन गेममध्ये नफ्याचे आमिष दाखवत एकाची २३ लाख ६० हजारांची रक्कम लाटण्यात आली. दुसऱ्या एकाला शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत ४ लाखांना लुटण्यात आले.

आश्रय कॉलनीतील इलियास (वय २८) नामक तरुणाने १५ फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर 'खेलो२४मॅच९९.कॉम' या वेबसाईटवर आलेल्या लिंकवर क्लिक केले होते. त्यानंतर त्याला एव्हीएटर गेमची जाहिरात आली. ही पाहून त्याने लॉग ईन करत अकाऊंट बनवले. सुरुवातीला १ हजार रुपये डिपॉझिट करून गेम खेळायला सुरुवात केली. आधी त्याला थोडासा नफा दिसू लागला. त्यामुळे विश्वास ठेवून इलियास गेम खेळत राहिला; मात्र खेळ पुढे खेळायचा असेल, तर आणखी रक्कम भरा, असे सांगत सायबर भामट्यांनी त्याला गुंतवून नेले.

अखेर ५ फेब्रुवारी ते ५ जून २०२०६ या काळात इलियासने एकूण २३ लाख ५९ हजार ७५० रुपये भामट्यांना कर्नाटक बँक व कॅनरा बँकेच्या खात्यावरून यूपीआयद्वारे पाठवले; मात्र त्यानंतर भामट्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. बनावट गेमिंग ॲपद्वारे फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर इलियासने गुरुवारी शहर सीईएन पोलिसांत तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT