Murder Case  Pudhari
बेळगाव

Belgaum Murder Case: लहान भावाकडून मोठ्याचा खून

मोबाईलचे निमित्त, हल्लेखोराला अटक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मोबाईल फोनचे निमित्त होऊन झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना मंगळूर येथे घडली आहे. हल्लेखोर आणि मृत भाऊ बैलहोंगल येथील आहेत. अडिवेप्पा (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्याच्या खुनाबद्दल त्याचा लहान भाऊ राजूला (वय ३६) अटक करण्यात आली आहे.

मंगळूर शहरातील कोटार क्रॉसजवळ अडिवेप्पा, राजू आणि त्यांची आई भाडोत्री घरात राहातात. त्यांची आई रस्त्याच्या कडेला एक छोटेसे दुकान चालवते. तर दोन्ही भाऊ रोजंदारीवर काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान मोबाईल फोनवरून या दोघा भावांमध्ये वाद झाला. दोघेपी मद्यधुंद होते. वादादरम्यान राजूने अडिवेप्पावर चाकूने वार केले. वार वर्मी बसल्याने त्याचा मृत्यू झाला.

दुकान बंद करून घरी परतल्यावर आईला अडिवेपपा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. उर्वा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन राजूला अटक केली. हे कुटुंब मूळचे बैलहोंगलचे असून, उदरनिर्वाहासाठी ते मंगळूरमध्ये राहत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT