Accident Pudhari
बेळगाव

Belgaum Accident : कार झाडाला धडकून तरुण ठार

खानापूर-अळणावर मार्गावर अपघात; चौघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याकडेच्या झाडाला धडकून तरुण ठार झाला तर चौघेजण जखमी झाले. रामनगर-अळणावर मार्गावर कुंभार्डा (ता. खानापूर) गावच्या हद्दीतील कृष्णनगरजवळ मंगळवारी (दि. १७) दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. संतोष नीलप्पा राठोड (वय २८, रा. मजूर, शिरहट्टी, जि. गदग) असे मृताचे नाव आहे.

चालक शंभनगौडा चंद्रगौडा इंगळगी (वय ३०, रा. पाळ, ता. शिर्सी, जि. कारवार, नवीन निजगुणप्पा सादर (वय २४, रा. हिरेहरकुनी, ता. कुंदगोळ, जि. धारवाड), राहुल तिप्पण्णा लमाणी (वय १९, रा. मजूर, शिरहट्टी, जि. गदग) आणि होन्‍नप्पा बसवराज महांतप्पण्णावर (वय २६, रा. हिरेहरकुनी, ता. कुंदगोळ, जि. धारवाड) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्वजण फोर्ड इकोस्पोर्ट कारने (केए ०५ एमक्यू ६४३९) रामनगरहून अळणावरच्या दिशेने जात होता. कृष्णनगरजवळ चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याकडेच्या झाडाला जोरात धडकली. डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने संतोषचा जागीच मृत्यू झाला. तर नवीन सादर, राहुल लमाणी आणि होन्‍नप्पा महांतप्पण्णावर यांना किरकोळ दुखापती झाल्या. कारचालक इंगशगी यालाही गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT