Drowning Incident  Pudhari Photo
बेळगाव

Belgaum drowning incident: स्वीमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

पोहायला शिकताना नगरपालिकेच्या तलावातच दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

चिकोडी : शहरातील हरिनगर येथील नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावात पोहायला शिकत असताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे.

महेश मल्लप्पा बाडकर (वय २४, रा. केस्ती, ता. हुक्केरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोहण्याच्या तलावात पोहत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चिक्कोडीचे पीएसआय बसनगौडा नेर्ली यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT