बेळगाव

Belgaum News: येळ्ळुरात पेटल्या निर्धाराच्या मशाली

म. ए. समिती मोर्चाची जागृती : मशाल फेरीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीने गावात मशाल फेरी काढून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी (दि. २२) कन्नडसक्तीविरोधात आयोजित मोर्चाची जागृती करण्यात आली. त्यात शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सचिव प्रकाश अष्टेकर यांनी कायद्यानुसार कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेलाही घटनात्मक हक्क मिळावेत, अन्यथा मराठी भाषिक स्वस्थ बसणार नाहीत, असे सांगितले. येळ्ळूर म. ए. समितीचे अध्यक्ष वामन पाटील, समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, दौलत कुगजी आदींच्या हस्ते मशाली पेटवून फेरीला प्रारंभ करण्यात आला. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गावातील प्रमुख मार्गावरुन फिरल्यानंतर महाराष्ट्र चौकात फेरीची सांगता झाली.

कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, राजू पावले, दत्ता उघाडे, नागेंद्र पाखरे, महेश जुवेकर, शेखर पाटील, सुहास हुद्दार, उमेश पाटील, राजू मरवे, प्रा. आनंद आपटेकर, सुनील बाळकुंद्री, सागर पाटील, चांगदेव परीट, नागेश बोबाटे, शिवाजी सायनेकर, दयानंद उघाडे, सूरज गोरल, गणेश अष्टेकर, सतीश शि. पाटील, श्रीकांत नांदुरकर, प्रकाश पाटील, प्रकाश मालुचे, अनिल हुंदरे, नेताजी गोरल, शिवाजी कदम, यल्लुप्पा पाटील, सतीश देसूरकर, रमेश पाटील, शुभम जाधव, अनिल पाटील, नंदकुमार पाटील, कृष्णा शहापूरकर, राकेश परीट, दौलत पाटील, कृष्णा बिजगरकर, रमेश धामणेकर आदी यावेळी उपस्थित होते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT