Cyber fraud  File Photo.
बेळगाव

Belgaum Cyber Fraud : डॉक्टर महिलेची साडेसहा लाखांची फसवणूक

मैत्रिणीने पाठवलेल्या एपीके फाईलवर क्लिक करणे पडले महागात

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मैत्रिणीकडून आलेली एपीके फाईल उघडताच मोबाईल हॅक करून महिला डॉक्टरच्या खात्यावरील तब्बल ६ लाख ५२ हजार ९०६ रुपयांची रक्कम सायबर भामट्यांनी लांबवली आहे. सौंदत्ती येथील डॉक्टरची फसवणूक झाली असून, त्यांनी मंगळवारी जिल्हा सीईएन पोलिसांत फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी : सदर डॉक्टर महिलेचे कॅनरा बँकेत खाते आहे. ३० ऑक्टोबर रोजी त्यांच्या मैत्रिणीने त्यांच्या व्हॉटस्ॲपवर एक लिंक पाठवली. त्यावर ‘आरटीओ चलन’ असा उल्लेख असल्याने त्यांनी त्यावर क्लिक केले. परंतु, ती एपीके फाईल असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या मैत्रिणीला फोन करून मला एपीके फाईल का पाठवली, अशी विचारणा केली. त्यांच्या मैत्रिणीने आपला मोबाईल हॅक झाल्याचे सांगितले. तसेच, तू त्या फाईलवर क्लिक करायला नको होते, असेही सांगितले.

तथापि, काही काळानंतर त्याच दिवशी डॉक्टर महिलेचा मोबाईल हँग झाला. यानंतर त्यांच्या खात्यावरील ६ लाख ५२ हजारांची रक्कम गायब झाली. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरने मंगळवारी यासंबंधी जिल्हा सीईएन पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT