हुक्केरी : बेकायदेशीर गो वाहतूक करणारी वाहने रोखल्यामुळे 7 ते 8 हिंदू कार्यकर्त्यांना नारळाच्या झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात घडली. या घटनेमुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेकायदेशीर गो वाहतूक करणार्यांना रोखल्यामुळे श्रीरामसेना कार्यकर्त्यांना झाडाला बांधून चोप देण्यात आला. 7 ते 8 कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून नैतिक पोलिसगिरीचे प्रदर्शन केले आहे. या घटनेनंतर दोन्ही गटाच्या तरुणांनी पोलिस ठाण्यात जाऊन चूक कबूल केली आहे.
जिल्हा श्रीरामसेना प्रमुख विठ्ठल गड्डी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही अशा घटना घडत आहे. पोलिस ठाण्यात हिंदू कार्यकर्त्यांवर अनावश्यक आरोप करण्यात आले. राज्यात कायदा सुव्यवस्था नसून मुख्यमंत्री सिद्धरामय्या हिंदूंचे रक्षण कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यमकनमर्डी पोलिस स्थानक हद्दीत ही घटना घडली. 7 ते 8 कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून नैनिक पोलिसगिरीचे प्रदर्शन केले आहे.
गोरक्षकांना केवळ मुस्लिम समाजाने मारहाण केली नाही. तर गावातील सर्वधर्मियांनी मारहाण केली आहे. तसेच मारहाण केलेल्यांच्या विरोधात गोरक्षकांनी कोणतीही फिर्याद दिली नाही, असे पोलिसांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.