Accident News  pudhari photo
बेळगाव

Belgaum Accident: वाहनाला धडक, दुचाकीस्‍वार ठार

यरगट्टीहून बेळगावच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला धडक झाल्याने झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : यरगट्टीहून बेळगावच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला धडक झाल्याने झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना सोमवारी (दि. २४) बागलकोट-बेळगाव मार्गावरील मेकलमर्डी गावच्या हद्दीत घडली. लक्ष्मण सन्नरामप्पा तळगेरी (वय २१, रा. गोडची, ता. रामदुर्ग) असे मृताचे नाव आहे. लक्ष्मण तळगेरी दुचाकीवरून यरगट्टीहून बेळगावच्या दिशेने जात होता. मेकलमर्डी गावाच्या हद्दीत समोरून येणाऱ्या वाहनाशी दुचाकीची धडक बसली. या अपघातात त्‍याच्‍या डोक्याला गंभीर दुखापत होउन जागीच मृत्‍यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नेसरगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी नेसरगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT