बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात आवक वाढल्याने टोमॅटो, पालेभाज्या दर उतरले आहेत. मात्र, कांदा बाजारात प्रति क्विंटल दर २,५०० ते ५,००० रूपये झाला आहे. दरात ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. साखर प्रती किलो दर ५४ रूपये आहे. किरकोळ बाजारात कांदा ४० ते ६० रूपये किलो झाला आहे.
कांदापात, कोथिंबीर, लाल भाजी, शेपू आदींचे दर कमी झाले आहेत. होलसेल बाजारात टोमॅटो ५ रूपये किलो झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.५) लाल बटाटा प्रतिक्विंटल दर १,५०० ते २,४०० रूपये आहे. बाजारात इंदूर, आग्रा बटाट्याची आवक सुरू आहे. किरकोळ बाजारात बटाटा ३० ते ४० रूपये किलो आहे. बाजारात ३० ट्रक कांदा आवक झाला आहे. टोमॅटो ट्रे दर १०० ते १५० रूपये आहे. बाजारात दहा रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे.
एपीएमसी : (प्रति क्विंटल)
कांदा : २,५०० ते ५,०००
इंदूर बटाटा : १,७०० ते १,९००
लाल बटाटा : १,००० ते २,४००
रताळी : १,५०० ते २,५००
लसूण : ७,०० ते १०,०००
किराणा : (प्रति किलो)
साखर : ५० ते ५४, साधा चहा : ४५० ते ५००, दार्जिलिंग चहा : ५०० ते ७००, बारीक रवा : ५०, केसरी रवा : ५० ते ५५, मोठा रवा : ५०, इडली रवा : ४५, मैदा : ५०, आटा : ४५, बेसन : १२०, मध्यम पोहे : ५५, डिलक्स पोहे : ५५, साबुदाणा : १०० ते १२०, वरी तांदूळ : १३०, वाटी खोबरे : ४००, हळकुंड : २००, हळदपूड: १५० ते १८०, मोहरी : १५०, वेलची : २,०००
धान्य : (प्रति क्विंटल)
भात : २,६०० ते २,८००, बार्शी ज्वारी : ४,२०० ते ४,५००, विजापूर ज्वारी : ४,६०० ते ५,५००, हायब्रीड ज्वारी : ३,००० ते ३,५००, गहू : ३,२०० ते ४,२००, शेंगदाणा : ७,५०० ते ७,८००,
तांदूळ : सांधा तांदूळ : ३,००० ते ३,२००, स्टीम हंसा : ४,००० ते ४,५००, बासमती तुकडा : ३,२०० ते ३,५००, सोनामसुरी : ४,२०० ते ४,५००, रॉ राईस : ४,५०० ते ५,०००, कुमद तांदूळ : ७,००० ते ७,५००, बेळगाव बासमती ७,५०० ते ८,५००, दिल्ली बासमती ११,५०० ते १२,२००.
डाळी : (प्रति क्विंटल)
तूरडाळ : १२,२०० ते १३,०००, हरभरा डाळ : ८,५०० ते ९,५००, मूग डाळ : ११,२०० ते १२,०००, मसूर डाळ : ६,५०० ते ७,५००, उडीद डाळ : १४,५०० ते १५,७००, हरभरा : ८,००० ते ८,५००, जवारी मसूर : १३,००० ते १४,०००, नाशिक मसूर : १६,२०० ते १७,२००, मूग : ९,०००, मटकी : ११,२०० ते ११,५००.
भाजी : (दहा किलो)
टोमॅटो : १०० ते १५०, वांगी : २०० ते २५०, सिमला मिरची : २५० ते ३००, ओली मिरची : १५० ते २५०, बटका २५० ते ३५०, गवार (हायब्रीड) : २५० ते ३५०, गवार (जवारी): ५०० ते ७००, भेंडी : २०० ते २५०, बीन्स : ३०० ते ४००, कोबी : ८० ते १००, फ्लॉवर : २०० ते २५०, काकडी : २०० ते ४००, कारली : २५० ते ३५०, भोपळा क्विंटल : १,५० ते २००, आले : १,२०० , इंग्लिश गाजर : २०० ते २५०.
भाजी : (प्रति १०० जुडी)
कोथिंबीर : ४०० ते ५००, पुदिना : २०० ते ३००, पालक : ३०० ते ३५०, मेथी : ५०० ते ६००, लालभाजी : ३०० ते ४००, शेपू : ४०० ते ५००, कांदा पात : २०० ते ३००, मुळा पेंढी गठ्ठा : १५ ते २५
फळे (प्रति किलो)
सफरचंद : २५० ते ३५०, चिकू : ८० ते १२०, संत्री : १५० ते २५०, पेरू : ८० ते १००, केळी डझन : ३० ते ४०, जवारी केळी : १०० ते १२०, पपई : ४० ते ६०, किवी (तीन नग) : ९० ते १२०, डाळिंब : २५० ते ३५०, मोसंबी : १५० ते २५०.
खाद्यतेल (प्रति लिटर)
रिफाईंड शेंगा तेल : २००, साधे शेंगा तेल : १९०, रिफाईंड सनफ्लॉवर : १९०, सोयाबीन : १८०, पामतेल : १७०, वनस्पती : २२०, खोबरेल तेल : ४२०