बेळगाव

Belgaum Diwali Festival : वसूबारसने तेजोमय पर्वाला प्रारंभ

उपनगरांत गाय-वासरू पूजन : आज धनत्रयोदशी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहर, उपनगरांत वसूबारसने गुरुवारी (दि.५) चैतन्यमय आणि तेजोमय पर्वाला प्रारंभ झाला. विविध ठिकाणी गोधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करत गाय-वासरासह पूजन करण्यात आले. बुधवारी (दि. ११) भाऊबीजपर्यंत दिवाळी उत्सवाचे पर्व राहणार आहे. रविवारी (दि.८) लक्ष्मीपूजन, तर मंगळवारी (दि.१०) दिवाळी पाडवा आहे.

गुरुवारी दीपोत्सवाचा पहिला दिवस असल्याने अंगणात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. वसूबारसनिमित्त शेतकरीवर्गातर्फे जनावरांची पूजा करण्याची परंपरा जपण्यात आली. वसूबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीने हा सण भारतीय संस्कृतीतील निसर्गाचे पशुप्रेम दर्शवितो. कामधेनूचे रूप म्हणूनही गोपूजा केली जाते. गायीच्या पायावर पाणी ओतून हळद-फुलांची माळ गायीच्या गळ्यात अर्पण केली. तसेच ओवाळणी करून नैवेद्य देण्यात आला. गवळी गल्ली, कोनवाळ गल्ली, पाटील गल्ली, शहापूर, वडगाव, अनगोळ, खासबाग आदी ठिकाणी गायींची विधिवत पूजा करण्यात आली.

शुक्रवारी धनत्रयोदशीनिमित्त विविध दुकानांत धनाची पूजा करण्यात येणार आहे. धन्वंतरी व ब्रह्मपूजाही होणार आहे. रविवारी (दि.८) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजनाची धामधूम असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT