बेळगाव : सरकारी अधिकारी वा संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने भाषा वा धर्मभेद बाळगायचा नसतो. सर्वांना समान वागणूक देणे त्यांचे संविधानिक कर्तव्य आहे. परंतु, कर्नाटकचे उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा याला अपवाद ठरले आहेत.
बेळगाव जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करताना त्यांचा कन्नड दुराभिमान उफाळून आल्याचे गुरुवारी (दि. २९) पाहायला मिळाले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मराठी भाषिक महिलेशी संवाद साधताना न्या. वीरप्पा यांनी मराठी भाषिक रुग्णांना कर्नाटकात राहून कन्नड येत नाही का, असा सवाल केला.