Belgaum Cannabis Seizure 
बेळगाव

Belgaum Cannabis Seizure : ७० हजारच्या गांजासह दोघांना अटक

सीसीबी पोलिसांची कारवाई : भाग्यनगरात विक्री

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सुमारे ७० हजार रूपये किंमतीच्या गांजासह दोघा संशयितांना अटक केली. सीसीबी पोलिसांनी भाग्यनगर येथे ही कारवाई केली. कृष्णा गजानन पाटील (वय २४, रा. पापामळा, शिवाजी कॉलनी, टिळकवाडी) व रूपेश सुधीर शिंदे (वय २६, रा. नवी गल्ली, शहापूर) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, उपरोक्त दोघे संशयित अनगोळ-वडगाव रस्त्यावरील संतमीरा शाळेजवळील भाग्यनगर पाचवा क्रॉस परिसरात अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. त्यांनी आपले सहकारी उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व अन्य सहकाऱ्यांसह जाऊन तेथे छापा टाकला असता दोघांकडे १ किलो ३४६ ग्रॅम गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजा व लाख रूपये किंमतीची दुचाकी असा १ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांवर टिळकवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास निरीक्षक परशुराम पुजेरी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT