Crime News Pudhari Photo
बेळगाव

Belgaum Crime: जामिनासाठी बनावट कागदपत्रे; दोघांना अटक

मार्केट पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जामीन आवश्यक असलेल्या एकाला तो मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. न्यायालयाचीच दिशाभूल करण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मार्केट पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या दोघांना अटक करुन त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

गुन्हे प्रकरणात एकाला जामीन हवा होता. यासाठी इम्रान अब्दुल मिश्रीकोटी (वय ४८, रा. उज्ज्वलनगर दुसरा क्रॉस) व अविनाश पांडुरंग लाखे (वय ३९, रा. ज्योतीनगर, गणेशपूर) या दोघांनी त्या व्यक्तीला बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्रे तयार करुन दिली. ही बाब लक्षात आल्यानंतर मार्केट पोलिसांमध्ये दोघांवर एफआयआर दाखल झाला होता.

चक्क न्यायालयाची दिशाभूल केल्याचा हा प्रकार असल्याने मार्केटचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. उपरोक्त दोघा संशयितांना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT