बेळगाव

Belgaum Theft : ॲल्युमिनियमची वीजवाहिनी चोरणारे दोघे गजाआड

१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; चिकोडी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

चिकोडी : चिकोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करोशी येथे घडलेल्या ॲल्युमिनियमच्‍या वीजवाहिन्‍या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून १.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्‍यात आला.

करोशी येथील मोहम्मदअजर अब्दुलसमद पटेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ च्या दरम्यान करोशी हद्दीतील घटगी बसवेश्वरनगर येथील त्यांच्या नवीन प्लॉटमधील ८ वीजखांबांवरील सुमारे २०० किलोची ७०,००० रूपये किमतीची ॲल्‍युमिनियम वाहिनी चोरट्यांनी लांबवली होती. याप्रकरणी चिकोडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला होता.

जिल्‍हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी, चिकोडी उपविभागाचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर आणि सीपीआय विश्वनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडी पीएसआय शिवकुमार बिरादार यांच्या नेतृत्वात तपास पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने १० सप्टेंबर रोजी दोघांना अटक केली.

सुभान आदामसाब मुलतानी (वय २८, रा. हंजानाट्टी, ता. हुक्केरी), अप्पण्णा केमपण्णा करडी (वय ३२, रा. हंजानट्टी, ता. हुक्केरी) अशी त्‍यांची नावे आहेत. त्‍यांच्याकडून ॲल्‍युमिनियम वीज वाहिनी, दोन दुचाकी असा एकूण १,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सीपीआय विश्वनाथ चौगुले, पीएसआय शिवकुमार बिरादार तसेच कर्मचारी एस.आर. भागाई, गजानन एस. कांबळे, एस.पी. गलगली, रामू जी. कुळ्ळोळी, विजयकुमार बी. पाटील, रमेश एस. हादिमनी आणि तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नवर यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT