बेळगाव : मकर संक्रांतीच्या सुट्टीनिमित्त खडीच्या खाणीत पोहण्यास गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा गुरुवारी (दि. 15) बुडून मृत्यू झाला. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्याच्या जालिकट्टी गावाजवळ ही दुर्घटना घडली.
प्रमोद बडिगेर (वय 17)आणि मनोज (वय 17) (पूर्ण नाव समजू शकले नाही) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही अकरावीत शिकत होते. बुडणाऱ्या तिसऱ्या विद्यार्थ्याला स्थानिक लोकांनी वाचविले अशी माहिती मिळाली आहे. लोकापूर पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.