traffic diversion File Photo
बेळगाव

Belgaum news: बेळगावात आज रहदारी मार्गात बदल

शिवजयंती मिरवणूक : वाहनधारकांनी दखल घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मंगळवारी निघणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीसाठी शहरातील रहदारी मार्गांत बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल राहणार असून वाहनधारकांनी बदललेल्या मार्गांची दखल घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाने पत्रकाद्वारे केले आहे.

असा असेल वाहतूक मार्गातील बदल : किल्ला तलाव, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोडमार्गे खानापूरकडे जाणारी वाहने आरटीओ सर्कलपासून एसपी कार्यालय रोड, कोल्हापूर सर्कल, वाय जंक्शन, सदाशिवनगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्यानगर, बाची क्रॉस, आरगन तलाव, मिलिटरी हॉस्पीटलजवळील शौर्य चौक, केंद्रिय विद्यालय दोन, शर्कत पार्क, ग्लोब थिएटरमार्गे खानापूर रोडकडे सोडली जातील.

खानापूरकडून येणारी वाहने ग्लोब थिएटरमार्गे उपरोक्त मार्गावरून हिंडलगा रोड हनुमाननगर डबल रस्त्यामार्गे बॉक्साईट रोडमार्गे महामार्गावर सोडली जातील. गोगटे सर्कलकडून रेल्वे स्टेशन रोड, हेड पोस्ट ऑफिस तथा अंबा भुवन सर्कलमार्गे शनी मंदिराकडे जाणारी वाहने गोवावेस सर्कल, नाथ पै सर्कल, खासबागमार्गे संभाजी गल्ली रस्तामार्गे पुढे सोडली जातील. नाथ पै सर्कलकडून येणारी वाहने बँक ऑफ इंडिया, एसपीएम रोडमार्गे जातील. कपिलेश्वर ओव्हरब्रीजमार्गे जाणारी वाहने खासबागकडे वळवली जातील. जिजामाता चौकातून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर चौकातून पाटील गल्लीकडे जाणारी वाहने थेट सीबीटीमार्गे जुन्या पीबी रोडमार्गे पुढे सोडली जातील.

जुन्या पीबी रोडवरील सर्व वाहने भातकांडे स्कूल, कपिलेश्वर ओव्हरब्रीजकडे जाणारी वाहने खासबाग तसेच नाथ पै सर्कलकडे सोडली जातील. जुना पीबी रोड, यश हॉस्पिटल, महाद्वार रोडमार्गे कपीलेश्वरकडे जाणारी वाहने व्हीआरएल लॉजिस्टिकपासून जुन्या पीबी रोडमार्गे पुढे सोडली जातील. गुडशेड रोडमार्गे कपिलेश्वरकडील वाहने मराठा मंदिर गोवावेसकडे सोडली जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT