बेळगाव : ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू  
बेळगाव

बेळगाव : ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

Belgaum Accident : नाईंग्लज येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये लाकडे भरून घेऊन जात असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने टॅक्टरखाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.३) नाईंग्लज (ता.चिकोडी) येथे सायंकाळच्या सुमारास घडली. हणमंत रामा बेरडे (वय २७ रा. नाईंग्लज) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद खडकलाट पोलिसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, हणमंत बेरडे हे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये लाकडे भरून घराकडे निघाले होते. दरम्यान त्यांनी उंच भरावावरून ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर मागे फिरल्याने पलटी झाला. या अपघात ट्रक्टरखाली सापडून हणमंत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अनिता राठोड यांच्यासह हवालदार विशाल संभाजी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी बेरडे यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT