Pudhari Tours and Travels Exhibition 
बेळगाव

Pudhari Tours and Travels Exhibition: बेळगावात 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स' प्रदर्शन आजपासून

‘पुढारी’तर्फे आयोजन : पर्यटनप्रेमींची उत्‍सुकता शिगेला, देश-विदेशातील सहलींची पर्वणी

पुढारी वृत्तसेवा

​बेळगाव : ​ कोल्हापूर आणि सांगलीतील तुफान प्रतिसादानंतर आता बेळगावकर पर्यटकांना देश-विदेशातील पर्यटनस्थळांची माहिती एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी 'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६' सज्ज झाले आहे. या प्रदर्शनाबाबत मोठी उत्सुकता असून पर्यटन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 'गगन टूर्स' प्रस्तुत 'पुढारी टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६' पॉवर्ड बाय 'अ हेवन हॉलिडे'चे आयोजन शुक्रवारपासून (दि. २१) तीन दिवस मराठा मंदिरमध्ये करण्यात आले आहे.

बेळगावात दुसर्‍यांदा होत असलेल्या या पर्यटन एक्स्पोची जोरदार तयारी पूर्ण झाली असून, बेळगावसह सीमाभागातील लोकांना एकाच छताखाली पर्यटनविषयक सर्व माहिती आणि संधींचा खजिना उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे भविष्यात राहणाऱ्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. पर्यटनप्रेमींना वेगवेगळ्या पर्यटनसंस्थांची पर्यटनविषयक सर्व माहिती आणि संधीचा खजिना उपलब्ध होणार आहे.

​'नवीन वर्ष, नवीन दिशा अन् नवीन प्रवास' असा मंत्र जपत देश-विदेशातील स्वप्नवत पर्यटनस्थळांची सैर करण्याची, प्रवासाचे अचूक नियोजन करण्याची आणि पर्यटनावर मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफर्सचा 'ऑन दी स्पॉट' अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. पुढील स्वप्नवत सहलींचे उत्तम व बजेटमध्ये नियोजन करण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व नागरिक व पर्यटनप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन दैनिक 'पुढारी'तर्फे करण्यात आले आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीसारख्या आगामी सण-उत्सवांच्या काळात पर्यटनाचे नियोजन करणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक उत्तम पर्वणी ठरणार आहे.

धावपळीच्या जीवनशैलीतून वेळ काढून कुटुंबासोबत निसर्गरम्य ठिकाणी आनंद लुटू इच्छिणाऱ्यांसाठी येथे विविध बजेट-फ्रेंडली पॅकेजेस सादर करण्यात आली आहेत. यामध्ये विमान प्रवास, हॉटेल्स, स्थानिक वाहतूक आणि भोजन या सर्वांचा समावेश असलेली रेडीमेड पॅकेजेस पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिसा प्रक्रियेपासून ते थेट प्रवासाच्या अंमलबजावणीपर्यंत सर्व तांत्रिक बाबींचे सोपे मार्गदर्शन येथे एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळून सुट्ट्यांचे अचूक आणि किफायतशीर नियोजन करण्यासाठी हे प्रदर्शन लाभदायक ठरणार आहे.

​प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये व आकर्षणे

एकाच छताखाली संपूर्ण माहिती : देश-विदेशातील नामांकित आणि विश्वासू ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी थेट उपलब्ध.

​विविध डेस्टिनेशन्स : काश्मीर, हिमाचल, केरळसारख्या अंतर्गत पर्यटनस्थळांपासून ते युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पट्टाया, दुबई यांसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांची परिपूर्ण माहिती.

खास पॅकेजेस व बंपर सवलती : कौटुंबिक सहली, सिनियर सिटीझन्स स्पेशल टूर्स, हनिमून पॅकेजेसवर विशेष सवलती, फायनान्स सुविधा आणि आकर्षक 'ऑन-द-स्पॉट' बुकिंग सवलती.

तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन : बजेटनुसार सहल कस्टमाईज करणे आणि टूर प्लॅनिंगसाठी ट्रॅव्हल तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन. ​'पुढारी न्यूज', 'पुढारी ऑनलाईन', 'टोमॅटो एफएम' आणि 'टोमॅटो ब्रिगेड' यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट पर्यटन क्षेत्रात अत्यंत विश्वासार्ह ठरला आहे.

​विविध पॅकेजेस उपलब्ध

कौटुंबिक सहली, हनिमून पॅकेजेस, सोलो टुरिस्ट दुर्मी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष यात्रा अशा सर्व प्रकारच्या सहलींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध असणार आहे. आवडीनुसार आणि बजेटनुसार सहलीचे नियोजन येथे करता येईल. 'फनसाईट' जल पर्यटनासाठी बॅकवॉटरचा आनंद आणि वेगवेगळ्या पॅकेजेसवर सवलती मिळणार आहेत. पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहून प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.

अनेक लोकांना देश-विदेशात फिरण्याची इच्छा असते. मात्र, त्याची माहिती सहज उपलब्ध नसते. नवीन पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आणि आकर्षक ऑफर्स मिळवण्यासाठी 'पुढारी'चे पर्यटन प्रदर्शन बेळगावकरांना मनपसंत स्‍थळे निवडण्‍यास मार्गदर्शक ठरणार आहे.
​- अविनाश पोतदार, माजी प्रांतपाल, रोटरी क्लब
टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रदर्शनाला भेट देणे हा पर्यटनासाठी आनंददायी पर्याय असतो. 'पुढारी'चे हे प्रदर्शन नवनव्‍या प्रवासाची योजना आखण्यासाठी महत्‍वपूर्ण ठरेल. पर्यटकांना त्यांच्या गरजांनुसार नियोजन करता येईल. 'पुढारी'चे हे प्रदर्शन लोकांना मार्गदर्शक ठरणार आहे.
- युवराज हुलजी, अध्यक्ष, क्रेडाई बेळगाव

​स्थळ, वेळ आणि संपर्क

दिनांक : २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६

वेळ : सकाळी १०.०० ते रात्री ८.०० पर्यंत

स्थळ : मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव

अधिक माहितीसाठी संपर्क : ८१४९५८२४४२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT