Accident News  Pudhari File Photo
बेळगाव

Belgaum Accident : टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण ठार

गोकाक तालुक्यातील हुनशाळ पीजी येथे हा अपघात घडला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाले. बुधवारी (दि. २) सायंकाळी साडेचारच्या सुमारास गोकाक तालुक्यातील हुनशाळ पीजी येथे हा अपघात घडला. विनय विजय हिरेमठ (वय १९, रा. नागनूर केएम.) व श्रवण गुरूसिद्धय्या हिरेमठ (१७, रा. उळागड्डी खानापूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

याबाबत घटप्रभा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर तरुण दुचाकीवरून हुनशाळ पीजीकडून संगनकेरीकडे निघाले होते. यावेळी समोरुन आलेल्या भरधाव टेम्‍पोने दुचाकीला जोराची धडक दिली. दोघेही रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

घटनेनंतर टिप्परचालक न थांबता भरधाव निघून गेल्याने पोलिसांनी हिट ॲन्ड रनचा गुन्हा दाखल करून घेतला. घटप्रभा पोलिसांत नोंद झाली असून हेड कॉन्स्टेबल एम. एस. दोड्डण्णावर याचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT