बेळगाव

Belgaum Temple Theft : हिंडलगा, आंबेवाडीतील मंदिरांत चोरी

विठ्ठल, लक्ष्मी मंदिरांतून किरीट, पादुका, चांदीचा दांडा लंपास

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ग्रामीण भागातील मंदिरांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून, हिंडलगा आणि आंबेवाडी येथील दोन मंदिरांत चोऱ्या झाल्या आहेत. हिंडलगा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी चांदीचे किरीट आणि पादुका लंपास केल्या. तर आंबेवाडीच्या मारुती गल्लीतील लक्ष्मी मंदिरातील चवरीचा चांदीचा दांडा चोरून नेण्यात आला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हिंडलगा येथील बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. विठ्ठल मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचे किरीट आणि चांदीच्या पादुका चोरून नेल्या.

दुसरीकडे, आंबेवाडी येथील मारुती गल्लीतील लक्ष्मी मंदिरातही चोरट्यांनी हात साफ केला. तेथील चवरीचा चांदीचा दांडा लंपास करण्यात आला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यांमध्ये या घटनांची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT