बेळगाव

Belgaum Sports News : आंतरराज्‍य स्पर्धेत बेळगावला ४० पदके

गोव्‍यात जलतरणपटूंची चमकदार कामगिरी ; चौघांना वैयक्तिक अजिंक्यपद

पुढारी वृत्तसेवा

​बेळगाव : गोव्यातील सांगोल्डा येथील 'द आर्डी स्कूल'मध्ये 'फिट फॉर लाईफ'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्‍वीमर्स क्लब बेळगाव आणि ॲक्वेरियस स्‍वीम क्लबच्या जलतरणपटूंनी तब्बल १९ सुवर्ण, १२ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ४० पदके पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच, चार वैयक्तिक अजिंक्यपदेही पटकावली आहेत.

या स्पर्धेत सईली घुग्रेटकर (४ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य), रिचा पवार (४ सुवर्ण, १ रौप्य), नमन पाटील (४ सुवर्ण, १ रौप्य) आणि क्रिशा कुलकर्णी (३ सुवर्ण, १ रौप्य) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात 'वैयक्तिक अजिंक्यपद' पटकावले. याशिवाय राही कुलकर्णीने २ सुवर्ण, आरवी मुतकेकरने १ सुवर्ण व ३ रौप्य, साकेत होसमठने १ सुवर्ण व १ कांस्य, अभ्यंत पवार, जस्मिन अमृतिया आणि दर्शिका निट्टूरकर यांनी प्रत्येकी १ रौप्य व १ कांस्य पदक जिंकले. स्वर अमृतिया व विहान कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ रौप्य, स्वराली शिवणगेकरने ३ कांस्य आणि साची निट्टूरकरने १ कांस्य पदक पटकावून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.

हे सर्व जलतरणपटू बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव आणि केएलई आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर सराव करत आहेत. त्यांना उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुदुचकर, गोवर्धन काकतकर, महेश पवार आणि विनायक आंबेवाडीकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे. या यशाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाऊंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, अविनाश पोतदार, मानेक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आदींनी जलतरणपटूंचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT