बेळगाव

Belgaum Sugarcane Fire : दहा एकरातील ऊस भस्‍मसात

१० एकरातील उसाला शॉर्ट सर्किटने आग

पुढारी वृत्तसेवा

संकेश्‍वर : निडसोशी (ता. हुक्केरी) येथील शेतकरी संतोष पाटील व उमेश पाटील या शेतकऱ्यांच्या १० एकरातील उसाला शॉर्ट सर्किटने आग लागून नुकसान झाल्याची घटना निडसोशी ( ता. हुक्केरी) येथे रविवारी सकाळी घडली.

संकेश्वर- निडसोशी मार्गालगत असणाऱ्या पाटील यांच्या शेतवडीलगत ट्रान्सफॉर्मर असून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. उसाने पेट घेतला असताना गावातील ट्रॅक्टर चालक राकेश धनोडी यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने आणि एका टँकरच्या सहाय्याने आपला ट्रॅक्टर आगीतून बाहेर काढला. घटनास्थळी संकेश्वर अग्निशमन दल आणि बेल्लद बागेवाडी येथील विश्वनाथ शुगर्स कारखान्याच्या अग्निशमन पथकाकडून आग विझविण्यात आली.

संकेश्वर अग्निशमन दलाचे वाहन शेतातच बंद पडल्याचे समजल्‍यानंतर युवा नेते पृथ्वी कत्ती यांनी विश्वराज शुगर्सचे अग्निशमन दलाचे पथक आग विझविण्यास पाठवून दिले. घटनास्थळी अधिकारी बाळेश वारजी, माजी ग्रा. पं. अध्यक्ष संजू पाटील, संगम शुगरचे संचालक सुभाष पाटील, शांतेश पाटील, राजू यरगठ्ठी, साताप्पा करतगी, उमेश पाटील, मल्लाप्पा तनोडी, राजू मदिहळ्ळी, पीडीओ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT