बेळगाव

Belgaum news: अश्वत्थामा मंदिरावर पुन्हा दगडफेक

संतप्त नागरिकांकडून तरुणाची धुलाई; पोलिसांनी घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर एका माथेफिरू तरुणाने सलग तिसऱ्यांदा दगडफेक केल्याची घटना गुरुवारी (दि. २१) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून चोप दिला. याबाबत समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने यापूर्वीही दोनवेळा मंदिरावर दगडफेक केली होती. त्यावेळी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्या तरुणाला ताब्यात घेतले होते.

गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा त्याने अश्वत्थामा मंदिर परिसरात येऊन दगडफेक केली. मंदिरावर दगडफेक होताच परिसरातील नागरिक संतप्त झाले. नागरिकांनी त्याला पकडून धुलाई केली. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. याबाबत समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT