बेळगाव

Belgaum News: श्रीनगरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

९ जणांना चावा : महापालिकेच्या पथकाने केले जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल नऊजणांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) श्रीनगरमध्ये घडली. या कुत्र्याला महापालिकेच्या पथकाने पकडले असून, वाढत्या हल्ल्यामुळे शहर परिसरात दहशतीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. महापालिकेकडे तक्रार करूनही त्यावर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. मंगळवारी (दि. ११) श्रीनगरमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांवर हल्ला केला. त्यांच्या पायाचा, हाताचा आणि अंगाचा चावा घेतला. त्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले.

काहीजणांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. तर काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती मिळताच महापालिका पशुवैद्यकीय निरीक्षक राजू संकण्णावर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कुत्र्याचा मागोवा घेत त्याला पकडले. त्याला हिरेबागेवाडी येथील केंद्रात नेले असून उपचार करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT