theft Pudhari
बेळगाव

Belgaum theft: श्रीनगरमध्ये दीड लाखाची घरफोडी

दागिन्यांसह ३० हजार रुपयांची रक्कम लंपास

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरातील श्रीनगर येथील बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लांबवल्याची घटना सोमवारी (दि. २७) उघडकीस आली. तोळ्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी घरमालक आफताब हालशी यांनी माळमारुती पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यांनी फिर्यादीत असे म्हटले आहे की, घरमालक बाहेरगावी गेल्याने आई एकटीच घरी होती. त्या एकट्याच असल्याने घराला कुलूप लावून रविवारी (दि. २६) रात्री जवळच असलेल्या आपल्या मुलीकडे रात्री झोपण्यासाठी गेल्या. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लॉकर फोडून यातील लाखाचे दागिने, १७ हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या वस्तू व ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळवून नेली. दुसरे दिवशी सकाळी फिर्यादीची आई घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ही माहिती माळमारुती पोलिसांना कळवताच उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. येथून बाजूला असलेल्या एका घरातही चोरीचा प्रयत्न झाला. परंतु, तेथे काही हाती न लागल्याने चोरट्यांनी काढता पाय घेतला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून यामध्ये तिघेजण दिसत आहेत. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने ओळख पटविणे कठीण बनले आहे. तरीही त्यांना लवकरच जेरबंद केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT