बेळगाव : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा यंदा 16 नोव्हेंबरपासून अक्कलकोट येथून सुरु झाली आहे. बेळगाव शहरात सोमवारी (दि. 19) पादुकांचे आगमन होणार आहे. पालखी परिक्रमेनिमित स्वामी समर्थ आराधना केंद्रातर्फे 19 ते 25 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत.
सोमवारी दुपारी चार वाजता गोवावेस दत्त मंदिरात पालखीचे आगमन व स्वागत, नंतर वाजतगाजत मिरवणुकीने पालखी हट्टीहोळी गल्ली शहापूर येथे मुक्कामासाठी राहील. मंगळवारी (दि. 20) दुपारी चार वाजता महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ महाराज आराधना केंद्रात पालखीचे स्वागत होणार आहे. तेथे पादुकांचे दर्शन व महाप्रसाद वितरण होईल. परिसरात परिक्रमा झाल्यानंतर ही पालखी केंद्रात विसावणार आहे. तेथे पादुकांचे दर्शन व महाप्रसाद वितरण होईल.
बुधवारी ( दि. 21) सकाळी 10 ते 4 पर्यंत खासबाग ओमनगरमधील दीपक खोबरे यांच्या निवासस्थानी अभिषेक, पूजा व आरती होणार आहे. सायंकाळी टिळकवाडीतील समृद्धी शिंदे यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहणार आहे. गुरुवारी (दि. 22) वडगाव दत्त मंदिरात सकाळी 10 ते 3 पर्यंत पादुकांचे पूजन होणार आहे. सायंकाळी गुड्स शेड रोड येथील आदेश बर्डे यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहणार आहे.
शुक्रवारी (दि. 23) सकाळी 10 ते 1 पर्यंत मराठा कॉलनीत गिरीश कामत त्यांच्या निवासस्थानी पालखी पादुकांचे पूजन होणार आहे. सायंकाळी पिरनवाडीत आकाश देसाई यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहणार आहे. शनिवारी (दि. 24) सकाळी 10 ते 4 पर्यंत चिदंबरनगरमधील सचिन सांबरेकर यांच्या निवासस्थानी पालखी आणि पादुकांचे पूजन होणार आहे. सायंकाळी विनायकनगरमधील विश्वास बर्डे यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता कडोलकर गल्लीतील राजेंद्र गायकवाड यांच्या निवासस्थानी पालखी पूजन व मुक्काम राहणार आहे.