Shivam Fraud Case 
बेळगाव

Shivam Fraud Case: ‘शिवम’प्रकरणी अभिनेत्रींनाही नोटीस

सीआयडीकडून तयारी; बेळगावातील कन्‍नड महोत्सवाचीही चौकशी

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : शिवम असोसिएट्सच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेव घोटाळ्याशी सँडलवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी रागिणी द्विवेदी, वसिष्ठ सिंह, हरिप्रिया यांच्यासह अनेक कलाकारांना नोटीस बजावण्याची तयारी सीआयडीने केली आहे.

जमा केलेली रक्कम काही कलांकारावर खर्च करण्यात आल्याचे पुढे आले आहे. त्यामुळेच या कलाकारांना नोटीस बजावण्यात येणार आहे. यासह शिवमने बेळगावात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक प्रमुख व्यक्तींनाही नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. सर्व तपशील गोळा करणारे सीआयडी पोलिस, सँडलवूड आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना नोटीस बजावण्याच्या तयारीत आहेत.

गेल्यावर्षी २७ डिसेंबर रोजी शिवम असोसिएट्सने बेळगावात आयोजित केलेल्या 'कन्नड उत्सवा'त अभिनेता धनंजय, वसिष्ठ सिंह, रागिणी द्विवेदी आणि सप्तमी गौडा यांच्यासह अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चित्रपट कलाकारांना शिवम कंपनीने मोठ्या प्रमाणात मानधन दिले आहे.

कलाकारांना भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या ठेवींच्या स्वरुपात सर्वसामान्यांकडून कथितरित्या जमा केलेल्या पैशांच्या सुरु असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आता चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. सीआयडीने या कार्यक्रमात सहभागी झालेले अभिनेते आणि अभिनेत्रींकडून त्यांच्या सहभागाचे स्वरुप, कराराची व्यवस्था, मानधन आणि इतर संबंधित तपशिलांची माहिती मागितली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT